पूर्व विदर्भातील दुरदर्शी आणि मानवतेचे प्रतिक असलेले दिवंगत श्री. भोजराजजी भोंडेकर यांनी 11 फेब्रुवारी -2002 मध्ये भोंडेकर सांस्कृतीक क्रिडा व सामाजिक शिक्षण संस्थेची उभारणी केली. तळागाळातील वंचित, दुर्बल, मागासलेल्या लोकांच्या अंधकारमय जिवनात ज्ञानाचा व समृदधीचा प्रकाश आणण्याच्या ऐकमेव उद्देशाने ज्ञानाची गंगा भंडारा व गोंदिया जिल्हयात प्रगट केली.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील ग्रामीण, शहरी भागातील विदयाथ्र्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे , गुणवंत व व्यक्तीमत्वाचा संपूर्ण विकास व्हावा, समाजाच्या जडण घडणीत सहभाग घ्यावा व देशाचा विकास व्हावा. सोबतच प्रशासकिय सेवेत सामावेश करुन देशसेवेचे कांकण हाताला बांधावे हे ध्येय लक्षात घेऊन भोंडेकर शिक्षण संस्थेने भंडारा येथे प्रथमच बि.ए. (प्रशासकिय सेवा ) व एम.ए. (लोकप्रशासन) या अभ्यासक्रमाचे शिक्षण देणा-या महाविद्यालयाची सुरुवात भंडारा येथे केली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात व जागतीकीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत असतांना, संपूर्ण क्षेत्रात अभूतपूर्व बदल होत असतांना, विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शिक्षणाचा दर्जा सुधारणाची नितांत गरज आहे. महाविद्यालयात विद्याथ्र्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना रोजगारभिमूख आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांच्या स्वरुपात शिक्षण दिले जात आहे. स्पर्धा परिक्षांची पूर्व तयारी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात समृदध ग्रंथालय तसेच आवश्यक सोयीसुविधांनी महाविद्यालय सुसज्जित आहे.