भोंडेकर सांस्कृतिक,क्रिडा व सामाजिक शिक्षण संस्थेच्या रुपात लावण्यात आलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे. मतीमंद विदयार्थ्याच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन सुरु झालेली संस्था आज वैदकीय शिक्षण क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून नावरुपास येत आहे. बदलत्या काळातील शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना समोर जात संस्था प्रगतीच्या शिखराचा एक एक टप्पा पार करीत आहे. अर्थातच या संस्थेच्या वाटचालीत संस्था चालका प्रमाणेच प्रामाणिकपणे काम करण्याचा सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक बांधीलकीचा वसा घेवून वाटचाल सुरु केली कि, किती हि मोठे अडथळे आले तरी ते सहजतेने पार केले जावू शकतात हे या संस्थेच्या यशावरून सिद्ध झाले आहे. मतीमंद विदयार्थ्याना समाजाचा एक उत्कृ’B घटक बनविण्यासाठी केसलवाडा, नवेगाव बांध, नेरला या ठिकाणी शाळा सुरु आहेत.
संस्थे तर्फे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ए एन एम, जी एन एम पासून सुरुवात करण्यात आली आज BSC Nursing, PBBSC, MSC Nursing आयुर्वेद महाविदयालय असे टप्पे संस्थेने गाठले आहे. सोबतीला प्रशासनिक सेवेत ग्रामीण विदयार्थी मागे राहू नये या करिता B.A (Civil Services), M.A (लोकप्रशासन) हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. विदयार्थ्याच्या हितासाठी संख्याकरिता आलेले कार्य अभिनंदनीय आहे.